Parmanand Sawan...'s profileबोला गणपतीबाप्पा मोरया !...PhotosBlogListsMore Tools Help

बोला गणपतीबाप्पा मोरया !!!

Photo 1 of 13
More albums (1)
May 31

नाम

आपके जिंदगी के पन्नो पर
कही हमारा भी नाम हो,
जो ना रहा सका हर पन्ने पे
पर जहा लिखो वो पन्ना गुलेगुलफाम हो


February 27

अपुर्ण

जाणवतो काहीतरी अपुर्ण असल्याचा भास
जागतो खोल कुठेतरी पूर्ण्त्वाचा ध्यास
जन्मते व्यथित जीवाची ओढ
जळत राहते मंद मिणमिणती आस

कल

याद ना कर तू कल को इतना
की वो आज पे हावी हो जाए
खिली है जिंदगी तेरे सामने
दिख पाए..जो कम आँखोंकी नमी हो जाए

मौका दे अपने मुक्कदर को सवारने जिंदगी
संभाल...की तक़दीर रुसवा कही ना हो जाए
आस लगाए बैठे है तेरे अपने
तू जो शामिल उनकी खुशी मे हो जाए

महदुद ना रख मुराद को
ख्वाहिशे तेरी इक़बाल हो जाए
रख हौसला अपनी नेकी पे
तो उपरवाला भी तेरे साथ हो जाए

.......................................परमानंद सावंत
November 29

करावीशी वाटतेय पुन्हा एक कविता..

करावीशी वाटतेय
पुन्हा एक कविता प्रेमावर
फुलू द्यावे गोंडस कमळ
मनाच्या तरंगावर
 
अगदी भर ग्रीष्मातही
पावसाला बोलवेन या प्रेमाच्या कवितेत
जरा येऊन जा, तू येणार म्हणून
आतुर धरणी बसलीये वळवाच्या प्रतिक्षेत
 
उल्लेख नक्की करेन असे सांगितलय
समुद्राकाठच्या त्या सांज भेटीला
जेव्हा दाखवून आमिश मिठिचे
धरत होती लाट किनर्‍यास वेठिला
 
असेल एक ओळ तरी दिल्या घेतल्या वचनाची
दुसरी ओळ सोबत पाहिलेल्या स्वप्नांची
अभिमान यासाठी की जगलो सारी वचने
खजिल थोडासा की पूर्ण नाही झालीत काही स्वप्ने
 
उगाळुन आठवणींचे चंदन
होईन संथ ल्यावुन तेच माथ्यावर
नाहीच तर भर डेन आठवणी
या बोथट झालेया काळाच्या जात्यावर
 
सारांश म्हणून लिहीन उत्कट, उत्सुक , आवेग,
बेभान, गहिरे, अजाण, अवखळ
मनात नसतानाही अंत मात्र असेल असह्य,
अपरिमित, मंद, खोल , धूसर , क्षीण आणि अटळ
 
करावीशी वाटतेय
पुन्हा एक कविता प्रेमावर
फुलू द्यावे गोंडस कमळ
मनाच्या तरंगावर
August 25

थोडेसे पाणी गर्वाचेहि

तिला भास सतत साद घातल्याचा
माझ्याच आवाजाने, आवाजात अगदीच छोट्या
शब्द जुळेलच, म्हणून सांगतो
माझ्याही रात्री हाक एकण्यासाठी जाग्याच होत्या


तिला अनुभव तरंग दरवळणार्‍या सुंगंधचे
संभाषाण रंगायचे विसरून अस्तित्व अंतराचे
शब्द जुळेलच, म्हणून सांगतो
अंग माझेही शहारे पांघरूण शाल कल्पनेचे


तिला हट्ट माझे डोळे वाचण्याचा
चेह र्‍या ने सांगायच्या अगोदर मनात डोकावण्याचा
शब्द जुळेलच, म्हणून सांगतो
प्रयत्न माझाही, तिच्या डोळ्यात उतरून मनाचा ठाव घेण्याचा


तिचे प्रेम तिच्याच लेखणितले मी जेव्हा वाचले
माझे सागरा एवढे वाटणारे प्रेम एकाच डबक्यात साचले
शब्द जुळेलच, म्हणून सांगतो
थोडेसे गर्वाचेहि पाणी डोळ्यात दाटले....

July 08

आठवणींचे अस्तित्वच........


कधिकाळी जुळलेल्या स्वप्नातल्या गाठीभेठी
आज आठवणी होऊन सामोर्‍या आल्या
थोडेसे पाणी या कोरडया डोळयात
पण बराचसा आधार मनात देऊन गेल्या

आज त्यांना मी काहीच नं बोलता जाऊ दिले
मनातं नसतानाही ओघळणारे अश्रू पाहू दिले
आता मात्र चित्र माझ्या जीवनाचे आज पुन्हा एकदा सजवतो
आणि साज म्हणून या आठवणींनाच रंगं बनवीन म्हणतो

आठवतात ते दिवस अगदी कालच घड्ल्यासारखे
दोघचं घडवत होतो शिल्प स्वप्नांचे जणू जिवंत असल्यासारखे
स्वप्नांच्या छायेत आज पुन्हा एकदा विसावतो
आणि शीतल म्हणून या आठवणींनाच सावली बनवीन म्हणतो

देहभांन विसरायचे ते दिवस होते पावसाचे
हातात हात गुंफून फुलताना एकरुप होवून झुलायचे
ओल्याचिंब गारा आज पुन्हा एकदां वेचतो
आणि ओल्या म्हणून या आठवणींनाच सरी बनवीन म्हणतो

त्या दिवसांनी दिली कष्टाला स्फूर्ती, यशाला आनंदाची आसवे
चार गूंज मायेचे उन्हात चांदणे शिंपडल्यासवे
अनुभवण्या स्पर्शही आज पुन्हा एकदां धजतो
आणि ऊब म्हणून या आठवणींनाच कुस बनवीन म्हणतो

नसले उद्या सोबत्त कोणी तरी नसतील आठवणी सर्वस्व
वेदनेतले सुख शोधत असेल विवेकाचे वर्चस्व
आयुष्याचे आव्हान आज पुन्हा एकदां स्वीकारतो
आणि ध्येयं म्हणून या आठवणींचे अस्तित्वच नाकारीन म्हणतो...........
आणि ध्येयं म्हणून या आठवणींचे अस्तित्वच नाकारीन म्हणतो............

.........................................................................................परमानंद
June 25

हे आता दररोजचं झाले आहे..

हे आता दररोजचं झाले आहे..
हे आता दररोजचं झाले आहे..

वेळ तिन्हि सांजेची
सांगते माला आणिन मी तिला...

सुर्य ही ऊगीच रेंगाळतो
जान्याचे ताळून रोज नवीन बहाणे करतो...

त्यालाही पाहायचे असते तिलाच
म्हणून अस्वस्थ होऊन कधी दक्षीणेला तर कधी ऊत्तरेला येरझरया घालतो...

वाराही सैरावैरा लगातो पळू
ती यायच्या अगोदरच तीला इथे ठेवू का त्तिथे असे लागते होवू...

सांज मला काही नं सांगता निघून जाते
सुर्य आपला कुठेतरी तोंडं लपवून बसतो...

वारा थोडासा रागावतो
बोचरया थंडीने तीचा राग दूसर्‍यावर काढतो..

चंद्र मात्र असतो माझ्या साथीला
रात्र जागवायला ती नक्की येईल या आस्थेला...

                                                            परमानंद सावंत

आज अचानक येऊन गेली तीचं वळवाची सर...

आज अचानक येऊन गेली तीचं...

आज अचानक मनातले दु:ख जेव्हा काळजात आले
तेव्हा माझे डोळे पाणावले
नाही म्हणता पाहून माझी आसवे
सारे ऊगाचंच दुखावले

ती तेच पाहून आली
माझ्या अश्रूंशी स्पर्धा करायला
फक्त तीच्या येण्यानेचं आसमंत सुखावला
पाने फूलेचं काय काटाही फुलला

क्षण क्षण ऊजळला
मातीत सुगंधं आणि मनात ऊल्हास दूणावला
ठरवले पाहून तीच्या नयनात
ढळतील अश्रू आता फक्त इतरांच्या आनंदात

सांगायचे होते तिला इतकेच
दूसर्‍यानसाठी जग स्वत: जीतकेच
स्व:त नष्ट होताना इतरानं दे मायेची पाखर

आज अचानक येऊन गेली तीचं वळवाची सर....
आज अचानक येऊन गेली तीचं वळवाची सर...
     परमानंद सावंत

हि एकच खंत...

वाटे मला त्या सागरलाटांनचा हेवा
फिरून तेच आयुष्य त्या जगतात तेव्हा

पासून किनार्‍याच्या दूर जाताना
परतण्याकडेच त्यांचा जास्त ओढा

वीरून जातना मिठीत किनार्‍याच्या
दौडता उत्साहं नसे थोडा  

असेल कदाचीत चांदण्यानेही
हे त्यांच्याकडूनच शिकलेले

अबोला आज जरी आकाशाशी
उदयाचे आकाश मात्र चांदण्याने मंतरलेले

ऋतूंनाही जमते ही कला सोयरी
शिशीरातल्या पालझडीला वसंताची पालवी

आणि ग्रीष्मातल्या वैशाख वणव्या नंतर
धरतीवर उतरती गार श्रावणसरी    

मात्र मला होत नाही ते शक्य
क्षण आनंदाचे गवसतील पुन्हा हा एक प्रश्न

मनात काय त्याच्या तो का पाही अंत
वाट पाहण्याशिवाय नाही काही करू शकत हि एकच खंत

हि एकच खंत...
हि एकच खंत... 

                                                                         --परमानंद सावंत

आज आनंदात मी

आज आनंदात मी

मायेच्या सावलीत सुर्येतर सर्व
उसंत तेजाला मळ्भ विस्तीर्ण मी

धरती आकाश मिलनाच्या क्षितीजावर
वीज मिठीत स्तब्ध रोमांचीत मी

ऊबदार आसर्‍याच्या ओढीने
आसुसलेला किलबीलाट मधुर मी

मातीच्या गर्भातून व्यायलेला
ऊरभरुन श्वास उल्हासीत मी
 
सोडवण्या सरींचा गुंता
गोंधळ्लेल्या वार्‍याचा आवेगं अफाट मी

भूरभूरणार्‍या सरींनी ओला
न्हाऊन चींब हिरवागार मी

जाणतो स्वप्न जरी हे तरी
स्वप्नातल्या सत्यात मस्त बेधुंद मी

आला नाही आज वरूण तर काय पर्वा
आपलेच अश्रू पिऊन चातक परमानंदात मी                                        

                                                                                                                  

                                           -परमानंद सावंत

प्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणे...

ती म्हणाल होती प्रेम आहे माझे तुझ्यावर
नाही उमजला अर्थ तेव्हा तिच्या बोलण्याचा

माझ्याजवळं ती नाही, आता प्रत्येक आठवण सांधतो आहे
कळलेल्या प्रेमाचा अर्थ बांधतो आहे

कदाचीत प्रेम म्हणजे आपुलकीच्या बोलांसाठी आतुर्लेले का
ावसात
शब्दांच्या चिंबं विसरतातं देह्भान

कदाचीत प्रेम म्हणजे भेटीच्या ओढीत झुरणारी ती
का फक्त एका कटाक्ष्यासाठी त्याने ओवळून टाकलेला जीव

कदाचीत प्रेम म्हणजे पाणीदार बोलके डोळे
शब्द नको तिला उसने, ती डोळ्यातूनच बोले

कदाचीत प्रेम म्हणजे प्रत्येक क्षणाला तीचा विचार पहिला
आजही त्याने अर्धा घास तिच्यासाठी ठेवला

कदाचीत प्रेम म्हणजे पापण्यांमधे जपलेला सागर
ठेचं लागतच त्याला, तीला फुटलेला अश्रुंचा पाझर

कदाचीत प्रेम म्हणजे आठवणींचे धूके दाटलेल
निघून गेल्यावर अश्रूंच्या दवबिंदूसंगे मला वेढे
आता मात्र शब्धहलागतात अपुरे पडू
भावनांची गर्दी कशी कागदावर उतरव ?

पण आता कळतयं....
प्रेम म्हणजे दूसर्यासाठी जगणे
आपले विसरून दुसर्याच्या विश्वात रमंणे

प्रेम म्हणजे दूसर्यासाठी जगणे...
प्रेम म्हणजे दूसर्यासाठी जगणे...

                                                                                                    ....परमानंद सावंत

June 24

माझ्या कोकणच्या मातीचा....

माझ्या कोकणच्या मातीचा
गंधच वेगळा
ऊरभरुन जीवनाचा श्वास
असा रम्य सोहळा
 
तांबडया मातीचा गेरु
चारी क्षितिजे दूर विखूरलेला
त्यावर परशूने चौफेर
रंग मनमुराद उधळलेला
 
गगनभेदि सह्यढ्री रक्षती
ल्यावून हिरवा साज
नजर वाहेल तिथे उभे पहाड
तर कुथे खोल दरीचा भासं
 
मातीच्या ओढाने झेपावती
फेसाळ जलतुषार मधूर
मातीलाच बिलगून वाहते
सरीता सागर भेटीला आतूर
 
अळवावरचा प्रभातबिंदू नटावा
तसा माणसांमधे आपूलकीचा ऑलावा दाटावा
निसर्गही दिधतो साभार कोकणचा मेवा
सदैवं पाहुणचाराला आतूर कधिही येवा
 
माझ्या कोकणच्या मातीसाठी जीवन वेचावे
मातीवर येता संकट रक्षणा त्यासी अलिंगावे
माझी एक इच्छा अशीही
अंतही अपेक्षतो इथेच याच मातीच्या कुशीत
August 27

परमानंद


Is the stage in the life of human being when he sheds all his artificial inhibitions and orients self towards search of the absolute truth. The more one proceeds towards the truthful end, the bliss felt by him in all actions is but part of the eternal joy one had been seeking. Ananda ... the state of experiencing eternal and blissful joy finds its logical end when one reaches the source of all inhibitions ... the stage of Parmanand ... when all senses gets subdued, mind becomes absolutely calm and feeling of oneness of God is experienced.
Seek of the seekers, aim of the Yogis, hopefulness of the karma Yogis, a mile stone for those in search of God, stage of Parmanand is sought by one in all (though subconsciously in most cases). Not to be confused with happiness which is ephemeral and short-lived ... Parmanand is a permanent feature once you reach the requisite level of perfection.It is state of Extream happiness and joy. You may say state of nirvana or Ecstasy.
 

Parmanand Sawant

Occupation
Location
This person's network is empty (or maybe they're keeping it private).

Quote of the Day

Loading...